Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरदोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह..!

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.तरुणाने पत्नीला घरी सोडून बाहेरून येतो म्हणाला तो घरी परतलाच नाही.त्याची दुचाकी वर्धा जिल्ह्याच्या राहटी शिवारात तर मृतदेह नागपूरच्या कोंढाळीलगतच्या शिरमी शिवारातील जंगलात काल शुक्रवारी आढळून आला.शरीरावरील जखमांमुळे त्याची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले असून,त्यात एका महिलेचा समावेश आहे.चौघेही कोंढाळी येथील रहिवासी आहेत.मख्खनसिंग रणजीत सिंग बावरी वय ३८ वर्षे,रा.विकासनगर,कोंढाळी,ता. काटोल,जि.नागपूर असे मृताचे नाव आहे.तो पत्नीसह बुधवारी ३० जुलै रोजी कोंढाळी येथील आठवडी बाजारात गेला होता.रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने पत्नीला घरी सोडून दिले आणि पुन्हा मोटारसायकलने बाजारात गेला.तो रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइल फोनवर वारंवार संपर्क साधला. संपर्क होत नसल्याने त्यांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याचा शोध घेणे सुरू केले.त्याची मोटारसायकल वर्धा जिल्ह्यात आढळून आल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी तो बेपत्ता असल्याची कोंढाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्याअनुषंगाने ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख यांनी कोंढाळी येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.त्यातील एका फुटेजमध्ये तो बुधवारी रात्री ८:४१ वाजताच्या सुमारास तो दोन अनोळखी व्यक्तींसोबत मोटारसायकलवर बसून जात असल्याचे निदर्शनास आले.त्यातच काल शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला. अप्पर पोलिस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!