उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- कोंढाळायेथीलतडफदार,युवा नेतृत्व सांभाळणारे,सामाजिक,राजकीय व इतर क्षेत्रातील दांडगा अनुभव असणारे तसेच सार्वजनिक कार्यात हिरीहिरिने भाग घेणारे आक्रोश शेंडे यांची नुकतीच देसाईगंज तालुका युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आक्रोड शेंडे यांना काँगेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत,नरेंद्र गजपुरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
आक्रोश शेंडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम,काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आ.आनंदराव गेडाम,आ.विजय वडेट्टीवार,माजी आ.डॉ.नामदेवराव उसेंडी आदींना दिले आहे.देसाईगंज युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज चहांदे यांची निवड झाल्यापासून युवक काँग्रेसला तालुक्यातील गावागावांत मोठा प्रतिसाद मिळत असून शेंडे यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षास बळकटीकणासाठी मोठा हातभार लागणार असल्याने पुढील वाटचालीस काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आक्रोश शेंडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.