- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-छत्तीसगड राज्याच्या एका इसमाने दुरुस्तीसाठी दिलेल्या दोन बांदुकांचा वापर चोरीसाठी करण्यात आलेल्या तिघांना धानोरा तालुक्यातून तर एकाला छत्तीसगडहून अटक करण्यात आली आहे.
अशोक सुखराम बोगा,वय ३० वर्षे,घुमनसाय बैजुराम गावडे वय ३३ वर्षे,सुकालु आसाराम कोमरा वय ३२ वर्षे,तीघेही रा.गजामेंढी,ता.धानोरा,जि.गडचिरोली व बसंतकुमार कल्लो वय ४१ वर्षे,रा.नवागाव कोंडल, ता.दुर्ग,जि.कांकेर,छत्तीसगड याच्यासह चारही आरोपीस अटक करुन धानोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींकडून दोन नग देशी बनावटीच्या बंदुक,११ नग काडतुस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,रामभरोस सिताराम नामक ट्रक चालकाचा धानोरा तालुक्यातील सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चिखलात फसला.ट्रक बाहेर निघत नसल्याने त्याने रात्र झाली म्हणून ट्रकच्या कॅबीनमध्येच रात्र काढण्याचे ठरवले. रात्री झोपेत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबीनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली.डिझेल काढता न आल्याने आरोपींनी ट्रक चालकाच्या छातीवर व डोक्यावर दोन बंदुक ठेवून मोबाईल घेतला व पसार झाले.त्यानुसार ट्रक चालकाने मुरुमगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलीसांना दिले होते. सावरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गजामेंढी येथील तिघांना ताब्यात घेतले.त्यानुसार सदर प्रकरणाचे बिंग फुटले.
- Advertisement -

