- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवारच्या मध्यरात्री गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.पीयूष योगेश बारेवार वय २८ वर्षे,रा.गोरेगाव,मनोज कुरंजेकर वय २७ वर्षे आणि विनय कोहरे वय २८ वर्षे,दोघेही रा.सोनी,ता.गोरेगाव, जि.गोंदिया अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.तर जखमी तरुण गोरेगाव येथील असून जखमीवर गोंदियातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पीयूष व त्याचे सहकारी मित्र बुधवारी गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गोंदिया येथे गेले होते.मिरवणूक आटोपून रात्री उशिरा ते गोरेगावच्या दिशेने परतत असतांना हिरडामाली ते मिलटोली परिसरात दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला.यात दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले,तर जखमीला तातडीने रुग्णालयात हलवले.नेमका अपघात कशामुळे घडला,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
- Advertisement -

