Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का; मात्र नेपाळमध्ये केंद्रबिंदू….

दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का; मात्र नेपाळमध्ये केंद्रबिंदू….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का बसला असल्याची घटना उघडकीस आली आहे.मागील दोन आठवड्यापासून दिल्लीला तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की,लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असून ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.त्याचे धक्के दिल्ली परिसरालाही बसले.सध्यातरी या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाल्याची माहिती नसल्याचे पुढारी वृत्ताने म्हटले आहे.

तज्ज्ञांच्या मते,भूकंपाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सच्या स्थितीत बदल होणे. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत.या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात.या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरतात आणि दरवर्षी ४ ते ५ मिमीने त्यांच्या ठिकाणाहून सरकतात.अशा स्थितीत एक प्लेट दुसऱ्यापासून दूर जाते आणि दुसरी प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते.या प्रक्रियेदरम्यान,प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!