- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शिक्षक म्हणून कुठलाही अनुभव नसतांना पराग पुडके नावाच्या व्यक्तीची थेट मुख्याध्यापकपदाची शालार्थ आयडी तयार करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.त्यानुसार आरोपी पोलिस कोठडीत राहणार असून आज,मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिक्षक घोटाळ्यातील शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड यांनी देवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा येथील मुख्याध्यापक पराग पुडके यांना कुठलाही अनुभव नसताना त्यांची मुख्याध्यापक पदाची शालार्थ आयडी तयार करून मुख्याध्यापक बनविल्यामुळे शुक्रवारी रात्री उल्हास नरड व पराग पुडके यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोन नीलेश शंकरराव मेश्राम,शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय शंकरराव दुधाळकर वय ५३ वर्षे व शिक्षण उपसंचालक कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीक सूरज पुंजाराम नाईक वय ४० वर्षे अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या पीसीआर आरोपींचा काल सोमवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती.त्यानुसार हे आरोपी मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत राहणार असून आज मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करून पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे नागपूर सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -