- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-तेलंगणामध्ये आज,बुधवारी ४ डिसेंबरच्या पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून भूकंप इतका जोरदार होता की महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या काही भागातही त्याचे धक्के जाणवले.आज सकाळी या धक्क्यांमुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार,तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात सकाळी ५.३ रिश्टर भूकंप झाला. हैदराबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.सकाळी ७.२७ वाजता भूकंप झाला.त्याचे केंद्र जमिनीपासून ४० किलोमीटर खोल होते.छत्तीसगडमधील बिजापूर,सुकमा आणि जगदलपूर या तीन जिल्ह्यांमध्येही सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.
तेलंगणा राज्यात झालेल्या भूकंपाचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले आहे.आज सकाळी गडचिरोली शहरासह अन्य तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले.गडचिरोली शहरात आज सकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.घरातील टीव्ही,फ्रीज व अन्य वस्तू हलल्या,खिडक्यांची तावदाणेही वाजली.गडचिरोलीसह अहेरी तालुक्यातील अहेरी,आलापल्ली,नागेपल्ली,सिरोंचा तालुका आदी तालुक्यांतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.छत्तीसगड राज्याच्या काही भागातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा; असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
- Advertisement -