Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीतीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला कुठलाही ऑप्शनच नाही.दुसऱ्याच्या करणीचे खापर एकट्यानेच कां भोगावे? यासाठी तयार झालेल्या साखळीचे मुसक्या आवळल्या जाते.अश्याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या अति संवेदनशिल नक्षलग्रस्त भागात पेड्डीगुडम वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसमावर गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  मोठी कारवाई केली.विशेष म्हणजे,साहेबाने ठरवले ३ लाख रुपये,वनरक्षकाने वरिष्ठाच्या आदेशाचे पालन केले. त्यानुसार साहेबासाठी मागितले ३ लाख रुपये,यात खाजगी इसमाच्या मार्फतीने तडजोड झाली.तडजोड
अंती पहिला हप्ता ५० हजार रुपये देण्याचे ठरले आणि “तीन  तिघडा अन् काम बिघडा” अशी सर्वत्र जिल्ह्यात वार्ताच पसरली.५० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना मौजा गणेशपूर मुलचेरा रोडवर ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोलीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. १.श्रीनिवास मदनव्या कटकू,वय ५२ वर्षे, वनपरीक्षेत्र अधिकारी(RFO),वन परीक्षेत्र पेड्डीगुडम (वर्ग-२) रा.भगतसिंग रोड,रोड क्र.८,मंचेरीअल, तेलंगाणा,हल्ली मुक्काम मुलचेरा वन विश्रामगृह,ता.मुलचेरा, जि.गडचिरोली,२.नितेश पांडुरंग मडावी,वय ३७ वर्षे,वनरक्षक(वर्ग३),रा.नांदेड,ता.नागभिड,जि.चंद्रपूर, ३.प्रदीप गणेश मंडल,वय ५० वर्षे,रा. गणेशनगर पो.मुलचेरा.ता.मुलचेरा,जि.गडचिरोली-खाजगी व्यक्ती अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्रकरणातील तक्रारदार यांचेवर ११ जून २०२६ रोजी अवैध सागवण लाकूड बाळगल्यावरून पेड्डीगुडम वनविभाग अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावरून तक्रारदार यांचेकडे असलेले फर्निचर विक्रीचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास न पाठविणे करीता १७ जून २०२६ रोजी वनरक्षक नितेश मडावी याने वन परीक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांचे करीता तक्रारदारास श्रीनिवास यांचे निर्देशानुसार लाचेची मागणी केली.त्यानुसार,१८ जून २०२६ रोजी यातील वन परीक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांनी स्वतः करीता ३ लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी पहीला हप्ता ५० हजार रुपये  खाजगी इसम प्रदीप मंडल याचेकडे देण्यास सांगीतले. त्यावरून काल शुक्रवार १९ जून २०२६ रोजी प्रदीप मंडल यास ५० हजाराची लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.प्रकरणी मुलचेरा पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८(सुधारणा २०१८)चे कलम अप.क्र.८७/२०२६ कलम-७,७ (अ),१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सापळा अधिकारी तथा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधिक्षक विक्रांत सगणे, ला.प्र.वि.गडचिरोली,सापळा पथक पोहवा किशोर जौंजारकर,पोहवा राजेश पदमगिरीवार,पोहवा स्वप्नील बांबोळे,पो.अ.संदिप घोरमोडे,पो.अ.प्रविण जुमनाके, पो.अ. संदिप उडाण,पो.अ.हितेश जेट्टीवार,पो.अ.नुतेश धुर्वे,मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा राजेश्वर कुमरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण बगाटे, ला.प्र.वि.गडचिरोली तर डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधिक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो,नागपुर परीक्षेत्र,श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपुर,विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि.नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
  • पोलीस उपअधिक्षक विक्रांत सगणे👇
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरीक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन ब्युरो,गडचिरोली यांचेशी संपर्क साधावे.
पोलीस उपअधिक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालय गडचिरोली
मोबाइल / व्हॉटसॲप क्रमांक- ७५८८०४१०६४
दुरध्वनी क्रमांक-०७१३२-२९५०२०
टोल फ्री क्रमांक-१०६४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!