Saturday, June 20, 2026
Homeगोंदियातिसरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू.... -पाण्याने तुडूंब भरलेल्या मुरुमाच्या खाणीत दोघांचाही...

तिसरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू…. -पाण्याने तुडूंब भरलेल्या मुरुमाच्या खाणीत दोघांचाही आढळून आला मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शाळेतील दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या तिसरीतील दोन विद्यार्थ्यांचा मुरमाच्या खाणीच्या खड्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना गोंदिया तालुक्यातील दासगाव खुर्द येथे आज,मंगळवार १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारात घडली.आलोक भागचंद बिसेन व प्रिन्स किशोर रहांगडाले अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
आलोक व प्रिन्स हे दोघेही दासगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होते. आज,मंगळवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीत जेवण करून ते दोघेही बाहेर फिरायला गेले.मात्र,बराच वेळ झाला ते परत आलेच नाहीत.त्यानंतर शाळेने त्यांच्या पालकांना याची माहिती दिली.
दरम्यान,सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पालकांनी शोध घेतला असता शाळेजवळ पाण्याने तुडूंब भरलेल्या मुरुमाच्या खाणीच्या खड्यात दोघांचाही मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियातील केटीएस रुग्णालयात पाठवण्यात आले.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!