Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियातलावात तरंगताना आढळले तीन तरुणांचे मृतदेह..!

तलावात तरंगताना आढळले तीन तरुणांचे मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा गावात एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.गाव नजीक परिसरातील तलावात तीन तरुणांचे मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदरची घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आली.दरम्यान,रात्री उशिरापर्यंत तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. तिघांच्याही अंगावर संपूर्ण कपडे असल्याने शंका-कुशंका वाढीस लागली आहे.अभिषेक आचले वय २० वर्षे, आदित्य बैस वय १६ वर्षे,तुषार राऊत वय १८ वर्षे अशी मृत तरुणांची नावे असून तिघेही देवरी तालुक्याच्या पुराडा येथील रहिवासी आहेत.तीन तरुण तलाव परिसरात पोहायला गेले असते,तर एकाने तरी अंगावरील कपडे बाजूला काढून ठेवले असते.मात्र,तिघांच्याही अंगावर संपूर्ण कपडे असल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? अद्याप स्पष्ट झाले नाही.मात्र, तिघांच्याही मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!