- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अनुसूचित क्षेत्र (पेसा) तलाठी पदभरतीकरीता निवड यादी व प्रतिक्षा यादी तसेच जाहीरसुचना जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली यांचे संकेतस्थळ https://gadchiroli.nic.in येथे आज,७ ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.सदर यादीतील उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी उद्या दिनांक-८ ऑक्टोंबरला सकाळी ९:३० वाजतापासून जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)१७ संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत जाहिरातीनुसार सुरु झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या होत्या.काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता,तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता.परंतु जाहिर झाला नव्हता.पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अधिसूचित करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक-५ ऑक्टोंबर २०२४ तसेच महसूल व वन मंत्रालयाचे पत्रान्वये परवानगी देण्यात आलेली आहे.कागदपत्र पडताळणीनंतर शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.कागदपत्र पडताळणी करीता अनुपस्थित राहील्यास पुनश्च: संधी देता येणार नसल्याने उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -

