Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीतलाठी कार्यालये भाड्याच्या घरात; प्रशासनाचे दुर्लक्ष.. - कार्यालयाकरिता शासनाची झोळी रिकामीच..

तलाठी कार्यालये भाड्याच्या घरात; प्रशासनाचे दुर्लक्ष.. – कार्यालयाकरिता शासनाची झोळी रिकामीच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे महसूल प्रशासन हायटेक होत आहे.मात्र,जिल्ह्यातील बहुतांश तलाठी कार्यालय हे भाड्याच्या घरात आहेत.याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.शासनाला लाखो रुपयांचा महसूल गोळा करून देणारे कार्यालय म्हणून तलाठी कार्यालय मोलाची मदत करीत असते.मात्र,याच तलाठी कार्यालयांची काही ठिकाणी दैनावस्था झालेली आहे.बहुतांश तलाठी कार्यालये हे भाड्याच्या घरात चालत आहेत.शासन अनेक योजना राबवते. त्यामध्ये घरकूल योजना,इंदिरा आवास योजना यासह अनेक प्रकारच्या योजना राबवून अनेक बेघरांना व गरजू व्यक्तींना पाहण्यासाठी घर उपलब्ध करून देतात. मात्र,शासनाच्या अशा कार्यालयाकरिता शासनाची झोळी रिकामी असते.तलाठी कार्यालय हे शेतकऱ्यांच्या मदतीचे एक मुख्य केंद्र आहे.कार्यालयाद्वारे शेतकऱ्यांना सातबारा,गाव नमुना आठ, उत्पन्नाचे दाखले,जमिनीचे मोजमाप तसेच दुष्काळ, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेताची,घरांची नोंद घेऊन त्यांचे नुकसान शासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रथम कर्तव्य हे तलाठीच करतात.असे एक ना अनेक कामे हे तलाठी कार्यालयामार्फत केले जातात.काही ठिकाणी तलाठी कार्यालयाचे भाडे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.त्यामुळे याचा आर्थिक बोझा स्थानिक गावपातळीवर काम करणाऱ्या तलाठ्यांना सहन करावा लागत आहे.शासनाकडून नियमितपणे घरभाडे मिळत नसल्याने काही घरमालकांकडून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्याने तलाठीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.शासनाने याची दखल घेऊन तातडीने या समस्येचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!