Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीडुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात ‘डुंबरसात्या’ म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील वसा गावच्या जंगल परिसरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.बाळू विठ्ठल राऊत वय ४५ वर्षे, रा.वसा, ता.जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार,वसा येथील बाळू राऊत हे काल बुधवारी डुंबरसात्या आणण्यासाठी गाव नजीकच्या जंगल परिसरात गेले होते.बराच कालावधी लोटूनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह शोधमोहीम राबवली.दरम्यान,मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचा मोबाइल बंद दाखवत होता.मोबाइलचे लोकेशन शोधण्यासाठी सायबर सेलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले.मात्र मोबाइल बंद असल्याने लोकेशन कळू शकले नाही.त्यामुळे,गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली असता आज गुरुवारच्या सकाळी वसा गावालगतच्या जंगलात बाळू राऊत यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.परिसरात वाघाचा वावर असल्याने बाळू राऊत यांच्यावर वाघाने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण,आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन झणक यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!