Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीडिएपी खताऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन..

डिएपी खताऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-चालू खरीप हंगामामध्ये डिएपी खताच्या वाढत्या मागणीमुळे तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेता,शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.राज्य शासनाकडून मृद परीक्षण व जमिनीच्या आरोग्य पत्रिकांवर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबविली जात असून,जिल्ह्यात काही भागांत पेरण्या सुरु झाल्या आहेत.तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.त्यामुळे डिएपी खताच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.डिएपी खतामध्ये १८ टक्के नत्र (N) आणि ४६ टक्के स्फुरद (P) असते.
डिएपी खताच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पर्यायी खतांचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावा.यामध्ये एसएसपी हे सर्वात प्रभावी पर्यायी खत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.तेलबिया पिकांसाठी एसएसपी फायदेशीर ठरते.डिएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी वापरल्यास डिएपीचा उत्तम पर्याय तयार होतो.तसेच खालील संयुक्त खतांचा वापर देखील उपयुक्त ठरतो: NPK 10:26:26, NPK 20:20:0:13,  NPK 12:32:16, NPK 15:15:15, हे खत नत्र,स्फुरद व पालाश यांसारखी आवश्यक अन्नद्रव्ये एकत्रितपणे देतात,जे पिकाच्या संतुलित वाढीसाठी आवश्यक आहे.
याशिवाय,TSP (Tripple Super Phosphate) मध्ये ४६% स्फुरद असते.डिएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी TSP वापरल्यास हे देखील प्रभावी पर्याय ठरू शकते.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की,त्यांनी फक्त डिएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा विचारपूर्वक वापर करावा आणि पिकाचे पोषण संतुलित ठेवावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!