उद्रेक न्युज वृत्त
जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध कर्मचारी सहभागी झाले आहेत.पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाज कोलमडले. कृषी,शिक्षण,समाजकल्याण,भूमिअभिलेख, सामाजिक,महसूल यासह सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे कामचलाऊ कामकाज काही प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.
परंतु, महत्त्वाच्या सर्व टेबलवरील फायलींचा खच पडून आहे.त्यातच मार्च एंडिंग सुरू असल्यामुळे निधी योजनेचे काम सुरू आहेत.परंतु सुरू असलेल्या कामांना सुद्धा कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका बसला आहे.
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद गोंदिया -नरेश भांडारकर👇
जिल्हा परिषदेच्या ४७०० कर्मचाऱ्यांना नोटिसा जारी केल्या.विहित मुदतीच्या आत खुलासा सादर केला नाही तर, शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.