Friday, July 31, 2026
Homeगडचिरोलीजिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांमधील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी.

जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांमधील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समितीच्या तपासणी अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,शनिवार २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळांना आकस्मिक भेटी देत शाळांमधील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी केली.या भेटीदरम्यान त्यांनी शौचालयांची उपलब्धता, जेवणासाठी उभारण्यात आलेल्या शेड्सची स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा काटली,नगरी व वसाचक आदी शाळांना भेट दिली.त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून शाळेतील सुविधा व अडचणी जाणून घेतल्या.या दौऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश,शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे व बाबासाहेब पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
मूलभूत सुविधा व दुरुस्तीबाबत निर्देश
जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व शाळांमध्ये जेवणासाठी आवश्यक शेड्स पुढील एक वर्षात उभारण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या.यासोबतच स्वयंपाकाचे शेड अद्यावत करणे,शाळांच्या इमारतींमधील गळती थांबविण्यासाठी आणि स्वच्छता गृहांची दुरुस्ती तात्काळ करणे,जुन्या आणि निकामी झालेल्या साहित्याचे निर्लेखन करण्याची कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर👇
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत कां? याचीही चौकशी करण्यात आली.तसेच,विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयांची सोय आहे कां? याची तपासणी करीत कमतरता आढळल्यास तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.
या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विपिन साळुंके,उपअभियंता भांडारकर,मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर समग्र शिक्षा अभियानाचे लांजेवार,  हेमलता परसा,शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र साहाळा,मुलकलवार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!