Wednesday, July 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजातनिहाय जनगणनेची तीन जिल्ह्यांमध्ये होणार पूर्व चाचणी..

जातनिहाय जनगणनेची तीन जिल्ह्यांमध्ये होणार पूर्व चाचणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात जातनिहाय जनगणनेचा धडाका पुढील वर्षापासून सुरू होणार आहे.तत्पूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पासून राज्यातील सर्व प्रशासकीय सीमा गोठवण्यात येणार आहेत.गणना क्षेत्रे निश्चित झाल्यानंतर सीमांमध्ये बदल करता येणार नाही.प्रशासकीय सीमा निश्चित झाल्यानंतर तीन महिने लोटल्यास जनगणना  सुरू केली जाऊ शकते.त्यामुळे १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ या दरम्यान बदल करता येणार नाहीत. सीमांमधील कोणतेही बदल राज्यांच्या जनगणना संचालनालय व देशाच्या महानिबंधक कार्यालयाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कळवणे बंधनकारक आहे. जनगणना कार्यात कोणीही वगळले जाऊ नये किंवा दोनदा नोंदणी होऊ नये यासाठी प्रत्येक गाव किंवा शहराला समान आकाराच्या गणना क्षेत्रांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक क्षेत्रासाठी एक गणनाकर्ता नेमला जातो.जिल्हे,तालुके,पोलिस ठाणे,महसुली गावे इत्यादींच्या प्रशासकीय सीमांमध्ये बदल करायचे असल्यास ते ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी करून घ्यावेत,अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.२०२६ व २०२७ अश्या दोन टप्प्यात जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊन त्यात घरांची मोजणी केली जाईल.दुसरा टप्पा १ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होईल,ज्यामध्ये लोकांची लोकसंख्या,जात आणि इतर आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे.देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना केली जाणार आहे.जनगणना संचालनालय यासाठी एक ॲप लाँच करणार आहे.हे ॲप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी असेल.कुटुंब प्रमुख स्वतः त्याच्या घराची आणि कुटुंबाची माहिती भरू शकेल. ॲपवर तपशील भरल्यानंतर,जनगणना अधिकारी घरी जाऊन माहितीची उलट तपासणी करतील.त्यानंतर ती डिजिटल फॉर्मवर अपलोड केली जाईल.जनगणनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यावर १५० ते १७५ घरांची जबाबदारी असेल. जनगणना सुरू होण्यापूर्वी,राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये त्याची पूर्व-चाचणी केली करण्यात येणार आहे.सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी देशभरात सुमारे ३४ लाख कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!