Wednesday, June 10, 2026
Homeगोंदियाजलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटली; दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटली; दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटून दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १० जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. मोहित वसंत रहांगडाले वय २१ वर्षे व कुणाल शालिकराम भोंडे वय २० वर्षे,दोघेही तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील रहिवासी होते.
बरबसपुरा येथील ९ मित्र आज बुधवारी बोदलकसा येथील जलाशय परिसरात सहलीसाठी गेले होते.यात मोहित रहांगडाले,कुणालभोंडे,अक्षय बिसेन,राकेश लाडे,निखिल पटले,लकी रहांगडाले,प्रलय पारधी,मनीष कोकुडे आणि अविनाश टेकम यांचा समावेश होता. दुपारच्या सुमारास ९ मित्र जलाशयात बोटीद्वारे फेरफटका मारून आनंद घेत असतांनाच अचानकपणे बोट उलटली.बोट उलटताच सर्व तरुण जलाशयातील पाण्यात बुडू लागले.दरम्यान,सात जण पोहत-पोहत सुखरूप बाहेर पडले.मात्र,दोघे जण पाण्यात बुडाले. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बेपत्ता तरुणांचा शोध सुरू केला.उशिरापर्यंत दोन्ही तरुणांचा शोध सुरू होता.घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० हजाराची लाच भोवली; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असतांनाच नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज,बुधवार १० जून रोजी धडक कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य...

घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर; ९९.४६ टक्के नोंदी पूर्ण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताच्या जनगणना-२०२७ अंतर्गत सध्या राज्यभर घर-यादी गणना मोहीम राबविण्यात येत आहे.१० जून २०२६ रोजीच्या आढावा अहवालानुसार राज्यात सरासरी १३.१७ टक्के घर-यादी...

पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होतांना दिसत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – प्रधानमंत्री यांच्या दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने केले अभिनंदन..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा...

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक आज,बुधवार १० जून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!