- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-परतीच्या पावसाने रजा घेतल्याचे चिन्ह दिसताच धान कापणीला जिल्ह्यात वेग आला आहे. हलक्या धानासह मध्यम कालावधीचे धान कापणीचा हंगाम एकाच वेळी आल्याने मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.अत्यल्प प्रमाणात यांत्रिक पद्धतीने कापणी होत असल्याने मजूर टंचाईची समस्या आवासून उभी आहे.किमान महिनाभर हंगाम जोमात चालणार आहे.
जिल्ह्यात बाराही तालुक्यात धान कापणी बांधणीचा हंगाम सुरू झाला आहे.दरवर्षी प्रत्येक हंगामात मजूर टंचाईचा सामना शेतकरी बांधवांना करावाच लागतो. दिवसेंदिवस मजुरांच्या संख्येत घट होत असल्याने समस्या आवासून उभीच आहे.त्यामुळे शेती करणे खूप अवघड होत आहे.एकीकडे निसर्गाचा दणका व त्यात पुन्हा मजूर टंचाईचा चटका शेतीला संकटात नेणारा आहे.मजुराशिवाय शेती करणे अशक्य आहे.जग कितीही यांत्रिक झाले तरी प्रत्येक क्षेत्रात मजूर गरजेचाच आहे.
शासनाने विविध स्तरावर फुकट योजनांचा बाजार मांडल्याने श्रमाला किंमत उरली नाही.महिला व पुरुष निष्ठेने व जबाबदारीने श्रम उपसायला तयार होत नाही.महिन्याकाठी फुकट राशन,नगदी दरमहा अनुदान योजनांमुळे सहजतेने रुपये उपलब्ध होत असल्याने मजूरवर्ग शेतात घाम गाळायला धजावत नाही.प्रत्येक क्षेत्रात मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे
- Advertisement -

