उद्रेक न्युज वृत्त
मध्य प्रदेश (उज्जैन) :- चार्जिंगला लावून बोलत असतांना मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला.स्फोट इतका भयावह होता की,डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या.हातही धडापासून वेगळा झाला.मध्य प्रदेशातील उज्जैनपासून ४० कि.मी.वरील बडनगर या गावात ही भयावह घटना घडली.दयाराम बारोड वय ६८ वर्षे असे मृताचे नाव आहे.ओप्पो कंपनीच्या या मोबाईल फोनचे तुकडे जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत.बारोड शेतातील घरात एकटेच राहत होते.मित्र दिनेश चावडा यांच्यासोबत ते इंदूरसाठी निघणार होते; पण बारोड अजून आले नाहीत म्हणून फोन केला तर तो बंद होता. नंतर चावडा हे स्वतः बारोड यांच्या शेतातील घराकडे गेले. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला.
चार्जिंगदरम्यान स्फोट होण्याची कारणे
चार्जिंग दरम्यान फोनमध्ये रासायनिक बदल होतात. यावेळी फोनवर बोलण्याने, गेम खेळल्याने बॅटरी गरम होते व स्फोट होतो.
चार्जिंगदरम्यान फोनच्या आजूबाजूला किरणोत्सर्गाचे प्रमाणही वाढलेले असते. अशावेळी बॅटरी स्फोटाची शक्यता बळावते.