उद्रेक न्युज वृत्त :- चारोळी लेखिका तथा कवयित्री लता उमाकांत ढोक यांची विश्र्वसत्य फाऊंडेशन क्रांतीज्योती सावित्रीमाई साहित्यिक विचार मंच छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने २९ मार्च २०२३ रोजी चक्रवर्ती महान सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त अप्रतिम चारोळी लेखन तथा काव्य लेखन केल्याबद्दल सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
२९ मार्च २०२३ रोजी विश्र्वसत्य फाऊंडेशनच्या वतीने चक्रवर्ती महान सम्राट अशोक यांच्या जयंती प्रीत्यर्थ चारोळी लेखन,काव्य लेखन व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आयोजन प्रसंगी लता उमाकांत ढोक यांनी उत्कृष्ट चारोळी लेखन केल्याने विश्र्वसत्य फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव खंडारे, मार्गदर्शक भगवान खंडारे,समूह प्रमुख सुनीता तागवान,माला मेश्राम,सीमा वानखेडे,सह समूह प्रशासिका दुर्गा राऊत,धनश्री काळे,प्रिया भोले,कुसुम महिरे,वनिता एळींजे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

लता ढोक यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य अविस्मरणीय व उल्लेखनीय आहेत.पूर्वी त्यांनी गडचिरोली सारख्या अतिदुर्गम,बहुल,नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यात राहून जिल्ह्यातील महिला वर्गांना एकत्रित करून सामाजिक कार्यात त्यांच्या समवेत स्वतःला झोकून दिले.अनेक समाजाभिमुख कार्यात त्या स्वतः हिरीहिरीने भाग घेऊन जनसामान्य, गोर गरीब जनतेच्या प्रश्नांसाठी झटून मोर्चे काढणे, आंदोलने करणे,शासन दरबारी प्रश्न मांडून त्यावर अंमलबावणीबाबत निवेदने,स्वतः बड्या नेत्यांशी चर्चा व सल्लामसलत करून त्यावर तोडगा काढण्यावर भर देणे व इतर सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.यापूर्वी गडचिरोली अंधश्रध्दा निर्मुलन समितीवर त्यांनी काम केले आहे व हल्ली आता त्या नागपूर अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.