- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चातगाव(गडचिरोली):-युथ फॉर जॉब्स फाउंडेशन गडचिरोली व चातगाव पोलिस मदत केंद्र दादालोरा खिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून काल,३ डिसेंबरला चातगाव येथील पोलिस मदत केंद्रात जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात ५५ हून अधिक दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोविंद खटिंग प्रभारी अधिकारी पो.म.के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले तर प्रमुख अतिथी म्हणून कुसराम पोलीस उपनिरीक्षक,पो.म.के,चातगाव व गिरोलाचे पोलीस पाटील विलास मडावी उपस्थित होते.
जिल्हा फेलो,युथ फॉर जॉब्स फाउंडेशनचे उमेश बन्सोड यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना आणि त्यांचे फायदे याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण,स्वावलंबन कार्ड,लोन, रोजगागर आणि स्वरोजगाराच्या प्रशिक्षणाबद्दल माहिती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करून त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशोगाथा सांगून उपस्थित दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा आणि क्षमतांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.या विशेष दिवशी दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले.जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्या मागचा उद्देश म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांना समाजात सन्मानपूर्वक प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळवून देणे असल्याचे उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन युथ फॉर जॉब्स फाउंडेशनचे नितेश सिडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर मेश्राम यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चातगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
- Advertisement -