Monday, August 10, 2026
Homeकोल्हापूरचंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील तीन दिवसांपासून फरारच…-विशेष पथक...

चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील तीन दिवसांपासून फरारच…-विशेष पथक कोल्हापूरसह,सातारा,पुणे जिल्ह्यात  घेताहेत शोध….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोल्हापूर :- लाचखोरीप्रकरणी चंद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असलेले संजय जयसिंगराव पाटील (वय ५४, रा. आर.के.नगर, मूळ शिरदवाड, ता. शिरोळ) पाटील तिसऱ्या दिवशीही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या हाताला लागले नाहीत.विशेष पथक त्यांचा कोल्हापूरसह,सातारा,पुणे जिल्ह्यात शोध घेत आहेत.

दरम्यान, एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ जेरबंद झालेले कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ व दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.खताळ व खोराडे यांच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे;  अशी माहिती चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी दिली.बिअर शॉपीचा परवाना देण्यासाठी अधीक्षक संजय पाटील यांनी दुय्यम निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षकामार्फत तक्रारदार व्यावसायिकांकडे एक लाखाची मागणी केली होती.तक्रारदाराने याबाबत चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे फिर्याद दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता.फरार संशयित अधीक्षक संजय पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने याप्रकरणांकडे कोल्हापूर,सांगलीसह सातारा जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!