- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूर विभागासह राज्यातील शिक्षक भरतीचा मोठा विस्फोट झाल्याचे दिसून येत आहे.यात तब्बल ९ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.काहींना जामीनही मंजूर झाले आहेत.महत्वाचे म्हणजे,घोटाळ्यात शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच सर्वप्रथम नावे पुढे आल्याने अनेकजण भूमिगत होऊ लागले आहेत.अश्यातच आता काही संस्थाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.त्यातच ज्यांनी घोटाळे केलेत व मोठ्या रकमा हडपल्या,अश्यांवर कारवाई तसेच तपास सुरू ठेवा.पण ज्यांचा यात कसलाही संबंध नाही,अश्या शिक्षकांवर अन्याय करून त्यांचे पगार थांबवू नका, असे माजी आमदार तथा शिक्षक नेते नागो गाणार यांनी म्हटले आहे.अनेक शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मार्च २०२५ पासून थांबवण्यात आले आहेत.शालार्थ आयडी प्रकरणामुळे अनेक शिक्षक वेतनापासून वंचित असून,नाराज कर्मचारी आणि शिक्षकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.नागपुरात वेतनवंचित कर्मचाऱ्यांची बैठक झाली.बैठकीत सर्वांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि एकत्र येऊन पुढील लढ्याची दिशा ठरवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी माजी आमदार आणि शिक्षक नेते नागो गाणार यांची भेट घेतली.दोषी शिक्षकांवर कारवाई करा,पण इतर शिक्षकांचा पगार रोखू नका असे नागो गाणार यांनी लढ्याला पाठिंबा देत म्हटले आहे.याप्रकरणी शिक्षकांनी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांचीही भेट घेतली.तपास सुरू ठेवा,पण निर्दोष शिक्षकांचे वेतन तात्काळ सुरू करा, अशी मागणी शिक्षकांनी पोलिस आयुक्तांकडे केली.वेतन रखडल्याने अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे संसार अडचणीत आले आहेत.त्यामुळे जर या महिन्यातही वेतन सुरू झाले नाही,तर सर्व कर्मचारी आणि शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षकांच्या वतीने देण्यात आला आहे.
- Advertisement -

