Sunday, June 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'घिबली' फोटो वापर कर्त्यांनो सावधान..! वैयक्तिक सुरक्षा धोक्यात; समस्यांना आमंत्रण देण्यासारखे..

‘घिबली’ फोटो वापर कर्त्यांनो सावधान..! वैयक्तिक सुरक्षा धोक्यात; समस्यांना आमंत्रण देण्यासारखे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत,तितकेच तोटेही आहेत.पूर्वी ऑनलाईन ‘गूगल पे’, ‘फोन पे’ नसल्याने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून यायची.मात्र,आता कित्तेक बँकांध्ये ऑनलाईन व्यवहारामुळे रांगेत उभे राहणे कमी झाले आहे.त्यातच ऑनलाईन व्यवहार वाढले.पण तितक्याच फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झालेली दिसून येते.सुरुवातीला सतर्कता न बाळगल्याने अनेकांचे बँक खाते साफ झाल्याचेही आढळून आले आहेत.नंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली असल्याने आपण सर्वजण सतर्कता बाळगत आहोत.मात्र,अशातच आता हल्ली सोशल मीडियावर ‘घिबली’ फोटो टाकण्याचा जणूकाही ट्रेण्ड निर्माण झालेला आहे. सर्वसाधारण व्यक्तिंपासून ते सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतांना दिसून येत आहेत. आपली फोटो इतर संसाधनांना देऊन तिचे ‘घिबली’ फोटो म्हणजेच एखाद्या कार्टूनसारखी फोटो तयार केली जात आहे व ती अनेकांच्या पसंतीस येऊ लागली आहे.मात्र,देण्यात येणारी छायाचित्रे ‘एआय’ संसाधनांना देऊन आपली वैयक्तिक माहिती तीसऱ्यांच्या(त्रयस्थ पक्ष)हातात देत आहोत.त्यामुळे भविष्यात आपण दिलेल्या छायाचित्रांचा दुरुपयोग होण्याची शक्यता तसेच आपणांस त्रास,मनस्ताप होण्यासह वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,असे तज्ज्ञांचे मत आहे.त्यामुळे ‘घिबली’ फोटो वापर कर्त्यांनो सावधान..! वेळीच सावध होणे गरजेचे आहे.’घिबली’चे जपानी नाव ‘जिबुली’ असून,या शैलीसाठी वापरकर्ता आपले छायाचित्र ‘एआय’ला देत असतो.त्यानंतर वापरकर्त्यांचे छायाचित्र कार्टूनसारखे घिबली शैलीत तयार करून दिले जाते.हल्ली तरुणाईसह सेलिब्रिटी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक एआय कडे आपली भारंभार छायाचित्रे देऊन त्यांचे रूपांतरण घिबलीत करतांना दिसत आहे.हा ट्रेंड आला असला तरी हे कितपत सुरक्षित आहे,याचा कुणीही विचार करत नाही.त्यामुळे फोटोंचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढली आहे.यातून काही नैतिक,बौद्धिक संपदा हक्काचे भंग होणे आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत.आपली छायाचित्रे आणि इतर माहिती एआयला दिल्यानंतर व्यक्तीच्या सुरक्षेसंबंधीही प्रश्न निर्माण झाले आहेत.वापरकर्त्याकडून त्याची वैयक्तिक माहिती ‘एआय’ला दिली जाते.त्यामुळे वापरकर्ता कुठे आहे.कुठे राहतो,कुठे जातो,कुठे गेला होता. वापरकर्त्यांच्या कुटुंबात कोण कोण राहते.आपल्या संपर्कात कोणत्या व्यक्ती आहेत.याची माहिती छायाचित्रातून ‘एआय’ ला मिळत आहे.या माहितीचा दुरुपयोग सहज शक्य असून,यातून समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे; असे मत सायबर जगतातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.नवी कल्पना तसेच नवा ट्रेण्ड(कल)यामुळे अनेकजण त्याच्या आहारी जाऊ लागले आहेत.त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!