उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पिपल्स रिपब्लिकन पक्ष हा गोरगरीब, वंचितांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. आघाडीतील नेत्यांनी आमची बिघाडी केली म्हणुन आम्ही सत्ताधारी पक्षासोबत युती केली.यात आमचे काय बिघडले,पिरिपा कार्यकत्यांनी जोमाने कामाला लागावे,अन्याय,अत्याचार करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी.अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रेस क्लब गडचिरोली येथे पार पडलेल्या पिरिपाच्या जिल्हा मेळावा प्रंसगी बोलत होते.

पिरिपाच्या जिल्हा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर असून सदर मेळाव्या प्रसंगी पिरिपाचे कार्याध्यक्ष मुर्लीधर भानारकर,सरचिटणीस सोनु साखरे,शिद्धार्थ नंदेश्वर,जनबंधु आदिंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रा. कवाडे यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले.प्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर,शिद्धार्थ नंदेश्वर यांची पक्षवाढीबाबत समायोचित भाषणे झालीत . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप गोवर्धन तर आभार पिरिपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे यांनी केले. मेळावा प्रसंगी गडचिरोली जिल्हा लोजपाच्या शंभर कार्यकर्त्यांनी पिरिपात पक्ष प्रवेश केला.मेळाव्यास मुकेश खोबागडे,मारोती भैसारे,भुषण सहारे,परशुराम बांबोळे,श्रीनिवास गेडाम,प्रमोद सरदारे,हरिदास सहारे, रोशन उके,मोरेश्वर निमगडे,नाजुक भैसारे,अनिल बांबोळे,आर्या गजभिये,प्रेमदास रामटेके,अमोल कन्हाडे,मोरेश्वर राऊत,दिलबर जोगे,दादाजी रामटेके, मोहन मेश्राम,प्रमोद खोब्रागडे,संतोष खोबागडे,मोटघरे, विजय शेन्डे,रायपुरे व मेळाव्यात जिल्हातील बहुसंख्य पिरिपाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.