Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम न भरता शेतकऱ्यांना...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम न भरता शेतकऱ्यांना २ लाखाची मदत- जिल्ह्यातील २४ जणांना लाभ मंजूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- काहीवेळा शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकारावे लागते.अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठीच सदर योजना काढली गेली होती. जेणेकरून गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल.नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्य शासन चालविणार असल्याचे घोषित केले होते.खाजगी विमा कंपन्यांकडून होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी शासनाने ही घोषणा केली. या नंतर लगेच जिल्हयातील प्रलंबित २४ जणांचे प्रस्ताव कृष‍ि आयुक्तालयाकडून मंजूरही झाले.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो.त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे,नैसर्गिक आपत्ती,पूर,सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात,रस्त्यावरील अपघात,विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो.त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता,महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख एवढा विमा देण्यात येईल.शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख  रक्कम विमाच्या स्वरूपात दिली जाणार आहे.अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल,तर त्याला १ लाख विमा दिला जाईल. महाराष्ट्रतील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल,लाभार्थी चे पती/पत्नी,मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.

या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका अथवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!