Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीगोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सोमवार १८ ऑगस्ट पासून सुरू असलेला संततधार पाऊस तसेच विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगाण्याचे व आवश्यकतेनुसार शासकीय निवारागृहात आश्रय घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
गोदावरी उपखोऱ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणा राज्यातील कड्डम प्रकल्प तसेच श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.यासोबतच वर्धा,वैनगंगा व प्राणहिता नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.गोदावरी नदीच्या विसर्गाची क्षमता ९ लाख क्युसेक असून सध्या ५ ते ६ लाख क्युसेक पर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू आहे.मात्र,विविध प्रकल्पातील विसर्गामुळे यात अजून सहा लाख क्युसेक पर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.जिल्हाधिकारी पंडा यांनी राज्य आपत्ती पथकाच्या दलाला तसेच महसुल,पोलीस, ग्रामपंचायत व इतर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या व आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!