- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील
गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अनिल होळी यांनी आदिवासी समाजातील एकात्मतेच्या अभावावर आणि सरकारच्या धोरणांवर ठामपणे भूमिका मांडली.
मार्गदर्शनात प्रा.अनिल होळी म्हणाले की, “गोंडी संस्कृती व इतिहास हे जगातील प्राचीनतम संस्कृतींपैकी एक असूनही आजही गोंड समाज एकत्रित येऊ शकलेला नाही,ही चिंतेची बाब आहे. आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी सजग होण्याची आवश्यकता आहे.” यावेळी त्यांनी सुरजागड खाण प्रकल्प संदर्भात होणाऱ्या आदिवासींच्या शोषणाचा मुद्दा उचलून धरत सरकारवर जोरदार टीका केली. “जनसुनावणी म्हणजे जनतेच्या उपस्थितीत त्यांच्या मतांचा विचार करून निर्णय घेणे,मात्र सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी असून चार भिंतींच्या आत,लोकांचा आवाज न ऐकता घेतली जात आहे,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, “सरकार लोह प्रकल्पांची अंमलबजावणी जनतेच्या विरोधात करत आहे.आदिवासी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमण होत आहे.जनतेच्या भूमीवर प्रकल्प लादले जात आहेत,हे अत्यंत चिंताजनक आहे.” या कार्यक्रमाद्वारे गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा स्थापन करून समाजाला धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्र आणण्याचा संकल्प करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.योगेश सोयाम वैद्यकीय अधिकारी अमिर्झा,उद्घाटक रमेश कुमरे ( चंद्रपूर),कार्यक्रमाचे सह उद्घाटक कुंदन कोडापे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.एन.डी.पेंदाम (अहेरी), चव्हाण,राजू परचाके,अशोक कुळमेथे,घुमक जगन वेलके सह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -