- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात आता थंडीची चाहूल
लागली आहे.त्यामुळे आंघोळीनंतर मॉश्चरायझर लावल्याने त्वचेमधील पाणी साठवून ठेवण्यास जास्त मदत होते.ज्यांची त्वचा नाजूक आणि संवेदनशील आहे,त्यांनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.विशेषतः ज्यांना आधीच त्वचेचे आजार आहेत जसे की,सोरायसिस किंवा अटोपिक डर्माटायटिस यांनी सुद्धा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.सध्या वातावरणातील हे बदल नैसर्गिक आणि आल्हाददायक जरी असले,तरी या बदलत्या मोसमाचा परिणाम शरीरावर,पर्यायाने त्वचेवरसुद्धा होतो. थंडीच्या दिवसांत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते आणि म्हणून त्वचेतील पाणी शोषले जाऊन त्वचा कोरडी होते.त्वचेवर खाज येणे किंवा त्वचा रुक्ष होणे, असे प्रकार घड्डू शकतात.त्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे,शिवाय खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल किंवा जास्तच कोरडी त्वचा असेल,तर एखादा मॉश्चरायझर लावणे गरजेचे असते.अतिशय थंड पाण्याचा वापर टाळावा,कोमट गरम पाण्याने आंघोळ करावी,असा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
त्वचेत कोरडेपणा वाढल्यास सोरायसिस या आजाराची लक्षणेही वाढू शकतात.या आजारात शरीरावर लाल डाग विशेषतः हातापायांचे कोपरे, पाठीवर आणि डोक्यावर येतात.चांदीच्या रंगाच्या खपली या डागांमधून निघते.खाज जरी जास्त नसली, तरी थंडीमध्ये खाजेचे प्रमाण वाढते.हा आजार फक्त त्वचेपुरताच मर्यादित नसून त्याचे परिणाम इतर अवयवांवरही होऊ शकतात.योग्य वेळी उपचार न घेतल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह,स्थूलपणा,मणक्याचे आजारही उद्भवू शकतात,अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.जेणेकरून शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे,खनिज यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात मिळू शकतील,असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण व्यायाम करणे टाळतात.परंतु,या हंगामात व्यायाम करणे फायद्याचे आहे.नियमित व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ तर राहतेच शिवाय त्वचेतील पेशींची हालचाल व रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.त्यामुळे नियमित व्यायाम करावा.
- Advertisement -