Tuesday, July 14, 2026
Homeनागपूरगुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांविरुद्ध 'मकोका' अंतर्गत कारवाई..

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांविरुद्ध ‘मकोका’ अंतर्गत कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांविरुद्ध नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली आहे.यातील एकास भिवापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी केली असून, दुसरा फरार असल्याने त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नामदेव गोपीचंद सतीबावणे,रा.आमगाव निष्टी,जि.भंडारा व अजय चौधरी अशी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे असून,यातील नामदेवला तुरुंगात पाठविण्यात आले आहे,तर अजय फरार असल्याने पोलिस त्याच्या मागावर आहेत. भिवापूर-उमरेड मार्गावरील भिवापूर तालुक्याच्या मानोरा शिवारात गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या छोट्या मालवाहू वाहनाला ५ फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता.गुरांच्या अवैध वाहतुकीमागे श्रीकांत यादवराव चौधरी वय २७ वर्षे व प्रफुल्ल ऊर्फ भोला हेमराज चौधरी वय २३ वर्षे, दोघेही रा.नागतरोली ता.भिवापूर या दोन भावांचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.तपासादरम्यान नामदेव व अजय या दोघांसह अन्य एकाचे नाव पुढे आले आहे.भिवापूर पोलिसांनी या पाच जणांवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९)अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यामार्फत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे पाठविला होता.त्यांनी चौकशीअंती या प्रस्तावाला मंजुरी दिली.त्याअनुषंगाने भिवापूर पोलिसांनी काल मंगळवारी नामदेवला ताब्यात घेत त्याची नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली असून,अजयचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!