उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी :- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त गागंलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व गागंलवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तथा अलर्ट इंडिया मुंबई व सक्षम कुष्टांतेय स्वाभिमानी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गागंलवाडी येथे कुष्ठरोग जनजागृती मार्गदर्शनपर आरोग्य शिबीर संपन्न झाला.
स्टँड लाऊन कुष्ठरोगाविषयी व कुष्ठरोगामुळे येणारी विक्रूती कशी टाळता येईल तसेच कुष्ठरोगामुळे समाजात गैरसमज व चुकीच्या धारणा असल्यामुळे कुष्ठातेयासोबत भेदभाव केला जातो.त्यामुळे कुष्ठरूगणाना सामाजिक,कौटुंबिक सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.समाजात कुष्ठरुगणाना कुष्ठरोगी,माहारोगी म्हणयापेक्षा कुषठांतेय शब्द वापरण्यात यावा; समाजात प्रत्येकाला समानतेने, अधिकाराने जगता यावा; अशी माहीती अलर्ट इंडिया मुंबईचे प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर संदीप माटे,सक्षम कुष्ठातेंय स्वाभिमानी संस्थेचे मिलींद बारशिंगे, विद्याताई कांबळे,श्रावण भाऊ हाडेंकर यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना आरोग्य केंद्राचे मेडीकल आफिसर डॉ.भुरले,डॉ प्रियंका मडावी,एस के राऊत आरोग्य सहाय्यक,एस के धोटे आरोग्य सहाय्यक, एस बनकर एम पी डबलु,चहांदे,बगमारे, एम पी डबलु नदंगिरीवार ,कांबळे,बोरकर तसेच सर्व पी एस सी स्टाफ, तसेच गागंलवाडी गावचे प्रथम नागरिक विवेक बनकर सरपंच,प्रभाकर सेलोकर माजी सभापती,धनंजय बावने उपसरपंच आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य तथा मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.