Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीअखेर आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली……-'मजा मारे अधिकारी' अन् उपोषण...

अखेर आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली……-‘मजा मारे अधिकारी’ अन् उपोषण कर्त्याची तब्बेत नाही बरी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- ‘ अरे तू…. कितीही दिवस उपोषण कर; नाहीतर मरून जा’..मला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही.अशी गडचिरोलीचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे यांची मन धारणा झाली असावी; त्यामुळेच ते चालढकल करून दिवसेंदिवस आमरण उपोषण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.आज ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांचा उपोषणाचा १३ दिवस सुरू असूनही मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने ‘मजा मारे अधिकारी अन् उपोषण कर्त्याची तब्बेत नाही बरी’…. असे झाले आहे.त्यामुळे अखेर आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विभागीय वन अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल आमरण उपोषण कर्त्याची घेत नसून आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.त्यामुळेच मी कशी काय कार्यवाही करू?अशी बतावणी झोळे करीत आहेत.रामटेके यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की,कुठली तरी कार्यवाही करावी.मात्र झोळे हे उडवा-  उडवीची उत्तरे देऊन हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.रामटेके यांच्या मतानुसार,दिलेली तक्रार खोटी असेल तर माझ्यावर कार्यवाही करा; अन्यथा तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण दस्तऐवज उपोषणस्थळी आणून पाहणी करू व त्या नंतरच कार्यवाही करू; तसेही गणेशराव झोळे करीत नसल्याने संबंधितांना त्यांच्याकडून वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा कार्यवाही होणे अपेक्षित आहे. वरिष्टांशिवाय कनिष्ठ कुठलेही पाऊल पुढे टाकुच शकत नाही.त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी सत्यवान रामटेके यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!