- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जानेवारी २०१७ मध्ये बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने संस्थापकाविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.दरम्यान,मुंबई उच्च न्यायालयाला विद्यार्थिनीची तक्रार संशयास्पद आढळून आल्याने संस्थापकाचे निर्दोषत्व कायम ठेवत तक्रारकर्त्या विद्यार्थिनीचे अपील फेटाळून लावले.
प्रमोद वासुदेव साळवे असे महाविद्यालय संस्थापकाचे नाव आहे.गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव ता. धानोरा येथे साळवे यांचे नर्सिंग कॉलेज आहे.दरम्यान, जानेवारी २०१७ मध्ये बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने संस्थापकावर विनयभंग केल्याचा आरोप करून तक्रार केली.२१ डिसेंबर २०१९ रोजी सत्र न्यायालयाने साळवे यांना ठोस पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले.त्यामुळे तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल केली होती.सुनावणीदरम्यान साळवे यांचे वकील ॲड.राजेंद्र डागा यांनी महत्वपूर्ण मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
घटनेच्या वेळी महाविद्यालयातील १५० विद्यार्थी व कर्मचारी भोजनकक्षात होते.साळवे यांचे कार्यालय भोजन कक्षाजवळ आहे.तक्रारकर्तीच्या मित्रमैत्रिणींशिवाय इतर कोणीही या घटनेचे साक्षीदार नाहीत.तसेच घटनेपूर्वी तक्रारकर्ती तिच्या मित्रमैत्रिणींसह विनापरवानगी वसतिगृहाच्या बाहेर गेली होती.त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली होती.या कारणावरून तिने विनयभंगाची तक्रार केल्याचे ॲड.डागा यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने या प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून तक्रारकर्तीचे अपील फेटाळून लावले.नर्सिंग विद्यार्थिनीच्या विनयभंगाची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठालाही संशयास्पद आढळून आल्याने महाविद्यालय संस्थापकाचे निर्दोषत्व कायम ठेवले.
- Advertisement -