उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- हदयरोग,ब्लॉकेजेस,मधुमेह उपचार व मार्गदर्शन शिबिर आज शनिवारी १९ मार्च रोजी गडचिरोली प्रेस क्लबच्या भवनात संपन्न झाले.सदर शिबिराचे मार्गदर्शक चंद्रपूर येथील माधवबागचे डॉ.सरबेरे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजीक कार्यकर्ते प्रा.मुनिश्वर बोरकर,संजय ठेकाडे चंद्रपूर,डॉ. विजय रामटेके,प्रा.अनिल धामोडे,आनंद कंगाले आदी उपस्थित होते.
ॲन्जीओ प्लास्टी आणि बायपास सर्जरी टाळता येऊ शकते तसेच मधुमेह व ब्लड प्रेशर आजारांची औषध बंद करण्यासाठी यावर रामबाण उपाय म्हणून माधवबागचे औषधोपचार व सल्ला मसलात घेणे आवश्यक आहे.असे मोलाचे मार्गदर्शन डॉ.सरबेरे यांनी केले.सदर शिबिरात जवळपास १०० रुग्णांनी HB,ECG व इतर तपासण्या केल्या.
सदर शिबिरात मारोती भैसारे,ॲड.नंदेश्वर,प्रा.प्रकाश दुधे,रोशन उके,वनिता बांबोळे, लता भैसारे,विश्वनाथ येंनगंटीवार,तुळशीराम गेडाम,डि.आर.बोरकर,रमेश गोटेफोडे,खुशाल म्हशाखेत्री,अमिता टिपले,भिमराव शेन्डे,आनंदराव मदनकर,नाजुक भैसारे सहीत बहुसंख्य कार्यकर्ते व रुग्ण प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात प्रमोद भैसारे चंद्रपूर व माधवबागचे सहकार्य लाभले.