Thursday, October 22, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली पोलिस दलास मोठे यश; दोन नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली पोलिस दलास मोठे यश; दोन नक्षल्यांना कंठस्नान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील बोधीटोलाजवळ काल,गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आहे आहे.यात कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यालगत धानोरा तालुक्यातील बोधीटोलाजवळील सीमेवर नक्षल्यांची एक मोठी तुकडी तळ ठोकून असून पोलिस जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती जिल्हा पोलिसांना प्राप्त झाली होती.माहितीच्या आधारे परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले असता पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. एक तास चाललेल्या या धुमश्चक्रीनंतर नक्षली जंगलाच्या दिशेने पसार झाले.शोधमोहीम राबविली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळले.त्यांच्याकडे एके ४७ सह एसएलआर बंदूक आढळून आली. यातील एकाची ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१९ मध्ये नक्षल्यांनी जांभूळखेडा भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता.यात गडचिरोली पोलिस दलातील १५ जवान शहीद झाले होते.या स्फोटाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!