Wednesday, October 21, 2026
Homeगडचिरोलीआजी-आजोबा व नातीच्या हत्याकांडाचा पोलीसांनी लावला छडा….- तब्बल नऊ आरोपी जेरबंद

आजी-आजोबा व नातीच्या हत्याकांडाचा पोलीसांनी लावला छडा….- तब्बल नऊ आरोपी जेरबंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- भामरागड तालुक्यातील अतिसंवेदशिल पोलीस मदत केंद्र बुगी (येमली) हदीतील गुंडापूरी येथील निर्घृण हत्या करण्यात आली होती.या तिहेरी हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आठवड्याभरात तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करीत नऊ आरोपींना जेरबंद केले आहे.सदर हत्याकांडात मृतकांच्या नातेवाईकांचाच सहभाग असून जादुटोण्यातून हत्याकांड घडविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी काल, १३ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

रमेश कुमोटी,विनु कुमोटी(फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी,गुना कुमोटी,राजु आत्राम (येमला), नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी,तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली, रा. विसामुंडी, ता. भामरागड असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुंडापूरी येथील शेतशिवारातील झोपडीत ६ डिसेंबर रोजी रात्रो देवु कुमोटी (६०), बिच्चे देवु कुमोटी (५५) व मृतकांची नाती अर्चना तलांडी (१०) या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या करण्यात आली होती.मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी याने या आलदंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीअंती अज्ञात इसमांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचे गांभीर्य व क्लिष्ट स्वरुपाचे प्रकरण लक्षात घेत पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पोलिस पथकाने अत्यंत संयमाने तपासाची चक्रे फिरविली.तपासादरम्यान फिर्यादी विनू कुमोटी याने कुणावरही संशय वा वडिलांचा वाद असल्याबाबतचे नमूद केले नव्हते. परंतु फिर्यादी व त्याचा भाऊ शेतातुन परत येत असतांना अनोळखी दोन इसमांनी त्यांचे परिवारास घातपात करणार असल्याची घटनेच्या दोन दिवसापुर्वी धमकी दिली होती; अशी माहिती तपास पथकाला प्राप्त झाली.सदर बाब फिर्यादी व त्यांचे कुटूंबियांनी लपविल्याने पोलीसांची संशयाची सुई फिर्यादी व मृतकांच्या कुटुंबीयाकडे वळली.पोलिसांच्या गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार मृतक देवु हा परिसरातील मोठा पुजारी असून तो जादुटोणा करीत असल्याचा संशय गुंडापुरीसह परिसरातील काही गावांमध्ये होता.लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन संबंधित आरोपींनी अत्यंत योजनाबद्धरित्या व थंड डोक्याने सदर हत्याकांड घडवून आणल्याचे पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.

लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन संबंधित नऊही आरोपींनी कट रचुन मृतक देवु कुमोटी याचे डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार केला तर मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटी हिचा धारदार सुरीने गळा कापुन निघून हत्या केली. घटनेच्या दिवशी मृतकाची नात अर्चना तलांडी, रा. मरकल ही मृतकांसोबत असल्याने ती आपल्याला ओळखुन पोलिसांना माहीती देईल या भितीपोटील आरोपींनी कोणताच विचार न करता तिचा देखील धारदार सुरीने गळा कापुन निर्घृण हत्या केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!