उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दामरंचा जंगल परिसरातून एका जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठे यश आले आहे.वेल्ला केसे वेलादी वय ३५ वर्षे रा.भोपालपट्टनम,येडापल्ली ता.जि.बिजापूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे.
नक्षलवाद्यांद्वारे फेब्रुवारी ते मे या कालावधीत टीसीओसी कालावधी साजरा केला जातो.यादरम्यान नक्षली चळवळीद्वारे हिंसात्मक कारवायाचा घडवून आणल्या जात असल्याने त्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाद्वारे नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.याअंतर्गत गुरुवार,२३ फेब्रुवारी रोजी विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे दामरंचा जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना वेल्ला केसे वेलादी नक्षलवाध्यास अटक केली.वेल्ला वेलादी हा २००१ पासून जनमिलीशीया म्हणून नक्षलचे काम करीत होता. त्यानंतर २००६ पासून तो दिलीप आणि मंगी (संड्रा )दलममध्ये सदस्य पदावर होता.