Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेच्या २९ व्या सत्राचे मानकरी विलास टिकले…-देसाईगंज तालुक्याच्या कोकडी...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेच्या २९ व्या सत्राचे मानकरी विलास टिकले…-देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील कवी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

उपक्रमाचे २९ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३७ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी विलास गणपत टिकले यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “पंढरीच्या पांडुरंगा” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.विलास गणपत टिकले हे  कोकडी ता.देसाईगंज येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवी /कथाकार आहेत.त्यांना मराठी आणि हिंदीतून कथा,कविता, चारोळ्या व लेख  लिहीण्याचा विशेष छंद आहे.अनेक कथा,कविता,लेख व चारोळ्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या असून विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. 

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

२९ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने गजानन गेडाम, पुनाजी कोटरंगे,जयराम धोंगडे,संगीता ठलाल,उपेंद्र रोहनकर,शैला चिमड्यालवार,राजू सोनटक्के,वंदना सोरते,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,प्रेमिला अलोने,अतुल काशिनाथ गंडाटे,माधुरी अमृतकर, पुरुषोत्तम ठाकरे,रोहिणी पराडकर,केवळराम बगमारे,मुरलीधर खोटेले,विलास टिकले, कु.भावना रामटेके,प्रिती ईश्वर चहांदे,गणेश रामदास निकम,प्रब्रम्हानंद मडावी,मिलींद बी.खोब्रागडे,तुळशीराम उंदीरवाडे,सोनाली रायपुरे,प्रियंका वाकडे, डॉ.मंदा पडवेकर,किशोर बोरकुटे,खुशाल म्हशाखेत्री, वामनदादा गेडाम,रेखा दिक्षित,रंजना चुधरी,विलास जेंगठे, डॉ.मंदाकिनी चरडे, यु.एन.राऊत, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!