उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा आदिवासी,बहुल, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून जिल्ह्याची ओळख आहे.स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या गाजावाज्याने जरी साजरा केला जात असला तरी पोमडेंगी फेकणाऱ्या इतरांसाठी ठीक आहे.मात्र ‘गडचिरोली जिल्हा व भातावर भिल्ला’असे हल्ली चित्र निर्माण झाले असल्याचे जीवानी यांनी म्हटले आहे.
हे खालील प्रकारावरून निदर्शनास दिसून येत आहे.
आम आदमी पक्षाचे प्रकाश जीवनी यांच्या मतानुसार गडचिरोली जिल्ह्यास शासनाचा ठेंगा.. 👇
१) गडचिरोली ते वडसा रेल्वेस शासनाचा ठेंगा…
२) लोहप्रकल्प किंवा कोणतेही मोठे उद्योगास ठेंगा…
३) मेडिकल कॉलेजास ठेंगा …
४) जिल्ह्यात लोह खनिज पदार्थांची इतरत्र वाहतूक थांबविण्यास ठेंगा…
५) वडसा शहराला बस डेपोस ठेंगा…
६) वडसा एम आय डी सी स ठेंगा…
७) वडसा मध्ये पार्किंग झोनला ठेंगा…
८) शहरला आरोग्य सुविधांस ठेंगा…
९) किसान भवणास ठेंगा….
१०) रेल्वे अंडर ब्रिज नापास…पाणी साठल्यास ठेंगा..
११) शहराला बायपास देण्यास ठेंगा…
१२) शेतकऱ्यांच्या समस्यास ठेंगा…. टेबलाच्या वरून काम करण्यास ठेंगा….
सदर संपूर्ण प्रकरणांमध्ये असे वाटतेय की गडचिरोली जिल्ह्यात उंटा वरून शेळ्या हाकलण्याचे काम….नुकसानीचे सर्वे होऊन मदत शुन्य…उद्योग नाही..विकास नाही…कार्य शून्य..फक्त सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात पदभार सांभाळण्यास अनेकजण घाबरतात; मात्र जिल्ह्यात काही कालावधी वास्तव्य करताच चाटून-पुसून व धुवून टाकून पोबारा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचे आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवनी यांनी म्हटले आहे.यावर त्वरित आळा घातला जावा; अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे जीवनी यांनी म्हटले आहे.