उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- भारतीय हवामान विभाग,प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार ६ ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळ वारा (वाऱ्याचा वेग- ३० ते ४० किमी प्रती तास) येण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.अशातच गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,वर्धा जिल्ह्यात ७ एप्रिलला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.