- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत आज गडचिरोली जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक देसाईगंज (वडसा) रेल्वे स्थानकावरून विशेष वातानुकुलीत रेल्वेगाडीने अयोध्येला मार्गस्थ झाले. आमदार कृष्णा गजबे व सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज,उपायुक्त मधुसूदन धारगावे, भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी,देसाईगंज तहसिलदार प्रिती डुडुलवार यावेळी उपस्थित होते.

साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.राज्यात कोल्हापूर,जळगाव,मुंबई व भंडारानंतर तीर्थ दर्शनची रेल्वे आज,सोमवार ७ ऑक्टोंबरला गडचिरोली जिल्ह्यातून रवाना झाली.तिर्थदर्शनाला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात देसाईगंज (वडसा) रेल्वेस्थानक परिसर दणाणून सोडला होता.सामाजिक न्याय विभागाद्वारे ढोलताशात व पुष्पहाराने प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.आमदार गजबे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रति जिल्हा प्रशासनाच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले.
तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत नाश्ता,जेवन, औषध,वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे व त्यांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे आणि रेल्वेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे डॉ.सचिन मडावी यांनी सांगितले.
रेल्वेस्थानकावर विविध विभागाचे अधिकारी, समाजसेवक तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि तिर्थदर्शनासाठी निघालेल्या नागरिकांना निरोप देण्यासाठी जमलेले त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

