Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर..

गडचिरोली जिल्ह्यातील रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील रब्बी पिकांची सन २०२५-२६ या वर्षातील हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६५ पैसे इतकी ठरविण्यात आली आहे; अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे असून त्यापैकी १४८ गावे रब्बी पिकाची आहेत.या रब्बी पिकाच्या गावांपैकी ८८ गावांमध्ये पीके नसल्याचे आढळून आले आहे. उर्वरित रब्बी पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव नाही.तर ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या रब्बी पिकाच्या गावांची संख्या ६० आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ६० गावांमध्ये रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सन २०२५-२६ या वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी ६५ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!