Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा परिषदेत ४५ अनुकंपाधारक उमेदवारांना विविध पदांवर नियुक्ती..

गडचिरोली जिल्हा परिषदेत ४५ अनुकंपाधारक उमेदवारांना विविध पदांवर नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नेमणूक देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया बुधवार २५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद मुख्यालयातील राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडली.या प्रक्रियेत प्रतिक्षासुचीत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या जेष्ठतेनुसार,शैक्षणिक पात्रतेनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार पारदर्शकतेने नेमणुका देण्यात आल्या.गट-क संवर्गातील १८ आणि गट-ड संवर्गातील २७ अशा एकूण ४५ अनुकंपाधारक उमेदवारांची नेमणूक करण्यात आली.यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,वरिष्ठ सहाय्यक (लेखा),कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका,आरोग्य सेवक (पुरुष),विस्तार अधिकारी (कृषी),परिचर आणि चौकीदार या संवर्गातील पदांचा समावेश होता.उमेदवारांना त्यांच्या स्वीकृतीनुसार संबंधित पदांवर नियुक्ती देण्यात आली असून नियुक्ती आदेश संबंधित विभागाकडून शैक्षणिक अर्हता व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर प्रदान करण्यात येणार आहेत.पेसा क्षेत्रात नेमणूक मिळालेल्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांचे पेसा प्रमाणपत्र एका महिन्याच्या आत सादर करावे,अशी अट नेमणूक आदेशासोबत नमूद करण्यात आली आहे.सदर समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर शेलार,सहाय्यक प्रशासन अधिकारी फिरोज लांजेवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रितेश वनमाळी,वरिष्ठ सहाय्यक अविनाश कुमरे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!