उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्हा परिषद गडचिरोलीचे कुमार आशीर्वाद यांच्या बदली नंतर काल २६ जुलै २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातून आलेल्या आयुषी सिंग यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचा(सिओ)पदभार स्वीकारला.
आयुषी सिंग या पालघर येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. काल पदभार स्वीकारताच त्यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून तसेच सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी व दिव्यांगांसाठी आणि त्यांचे न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव उंदिरवाडे यांचे नियोजनातून नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे महिला कर्मचाऱ्यांकडून तिलक लावून स्वागत करण्यात आले.त्यानंतर राजेंद्र भुयार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,शेखर शेलार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन,रवींद्र कणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत,शिर्के प्रकल्य संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा फरेंद्र कुतिरकर,प्रकल्प संचालक जलजीवन मिशन व इतर खाते प्रमुख यांनी पुष्प गुच्छ देऊन आयुषी सिंग यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांचे परिचय घेतले.जिल्हा परिषद गडचिरोलीला प्रदीर्घ कालावधीनंतर महिला मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्याने तसेच त्यांचे पूर्वीचे कार्यकाल व त्यांच्या कार्यशैलीबद्दल विचार केला असता त्या उत्तम प्रशासक असल्याचे सिद्ध होते.असे उत्तम प्रशासकीय अधिकारी गडचिरोली जिल्ह्याला लाभल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.