Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा धानोरा तालुक्यात ऑनफिल्ड..

गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा धानोरा तालुक्यात ऑनफिल्ड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,सोमवार ७ जुलै रोजी धानोरा तालुक्यात भेट देत आपत्ती व्यवस्थापन,मलेरिया नियंत्रण,राष्ट्रीय महामार्ग व महसूल यंत्रणा आणि आरोग्य विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला.प्रसंगी पावसाळी काळात तालुक्यातील प्रशासनाच्या विविध यंत्रणांना अधिक सक्रिय व सजग राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तहसील कार्यालय धानोरा येथे आयोजित आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव,तहसिलदार आम्रपाली लोखंडे तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
  • धान्य पुरवठा बाबत विचारणा👇
मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा विचार करता,पूराच्या काळात संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी ‘नवसंजीवनी योजना’ अंतर्गत आवश्यक धान्य व औषधी उपलब्ध झाले का? याबाबत जिल्हाधिकारी पंडा यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने सजग राहण्याचे व पूरप्रवण ठिकाणी संभाव्य धोका निर्माण झाल्यास तातडीने वरिष्ठ प्रशासनाला कळविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
  • मलेरिया प्रतिबंध व स्वच्छतेवर भर👇
पावसाळी कालावधीत मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अश्या सूचना त्यांनी केल्या.पावसाळ्यात ठिकठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर करून परिसराची स्वच्छता राखणे,नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे,ओलसर परिसरात डासांचे निर्मूलन करणे आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी सांगितले.
  • राष्ट्रीय महामार्गाची पाहणी👇
धानोरा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या स्थितीकडे लक्ष वेधत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश दिले.जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासंबंधात नागरिकांच्या तक्रारी असून महामार्गाची दुरूस्ती व यासंबंधातील समस्या सोडविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाद्वारे गडचिरोली येथे किमान एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी,अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली.
  • आश्रमशाळांमधील सुविधांची तपासणी👇
जिल्हाधिकाऱ्यांनी धानोरा तालुक्याील सोडे येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.विद्यार्थ्यांच्या अभ्यास, पोषण आणि सुविधा याबाबत माहिती घेतली. तसेच अशा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण काय उपक्रम राबविता येतील याविषयी चर्चा केली.
  • शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा व एकलव्य निवासी शाळेची पाहणी👇
या दौऱ्यादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली व सेमाना येथील एकलव्य निवासी शाळेचीही त्यांनी पाहणी केली.विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना राबवण्याचे सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!