Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीपुढील २४ तासांत मुसळधार पाऊस..!

पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यंदाचे पाऊस प्रमाणापेक्षा म्हणजेच शंभर टक्के पेक्षा जास्त बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून यापूर्वीच वर्तविण्यात आली आहे.पावसासाठी पूरक असे वातावरण तयार होऊ लागल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसू लागला आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे यंदाच्या पावसाळी पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे,सतत पाऊस कोसळत राहिल्यास धान पऱ्हे होणार की नाही? अशी चिंता आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.अश्यातच आता विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पुढील २४ तासांत आणखी  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यानुसार सायंकाळी ७ वाजे पासून गडचिरोली जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत आहे.दरम्यान,काल रविवारपासून गडचिरोली,भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून काही मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले.आज,सोमवार ७ जुलै रोजी भंडारा ते कारधा नदीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी आणि चुल्हाड ते सुकळी नकुल दोन मार्गांवर पाणी आल्याने  रस्ते बंद करण्यात आले आहेत.अश्यातच गडचिरोली जिल्ह्यातील आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कुरखेडा तालुक्याच्या मांगदा ते कलकुली मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती.मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे,पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!