- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या स्वाधिन करा,या मागणीला घेऊन आज,शनिवार २२ मार्चला गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौक,आठवडी बाजार ते गडचिरोली-आरमोरी मार्ग चौकापर्यंत बुध्दिष्ठ इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा शाखा गडचिरोली व रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आंदोलन पुकारीत भव्य-दिव्य रॅली काढण्यात आली.सदर रॉलीचे नेतृत्व भोजराज कानेकर,प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली यांनी केले. बौद्धाची विरासत जगविणे हे काही एकट्याचे काम नव्हे तर सर्व बहुजनांच्या हक्काचे असल्यामुळे सर्वांनी सहभाग घेणे महत्वाचे आहे,असे मार्गदर्शन रिपाई नेते गोपाल रायपुरे यांनी केले.बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन देशभर सुरू आहे.बुद्धगया महाबोधी बौद्ध बांधवांच्या स्वाधिन करा अन्यथा जेल भरो आंदोलन करण्यात येईल,अशा ईशारा बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर यांनी दिला आहे.सदर धरणे आंदोलनात जनार्धन ताकसांडे,प्रमोद राऊत,डॉ. उज्वला शेंन्डे,डोमाजी गेडाम,आयेशा अल्ली,सुकदेव वासनिक,सुप्रिया मेश्राम,सुरेश मेश्राम,जयंत गेडाम, सुनिल चिमुरकर,दामोदर शेन्डे,दशरथ साखरे,लता भैसारे,अत्तरा जनबंधु,अरुणा उंदिरवाडे,संगिता बोदेले, अशोक वंजारी,कवि वसंत कुलसंगे,गायक विजय शेन्डे,ज्ञानराज जनबंधु,अमर खंडारे,शांतीलाल लाडे, नरेश बांबोळे,पुंडलिक शेंन्डें,आनंद अलोणे,अस्मिता भैसारे,संघमित्रा राजवाडे,मारोती भैसारे,लता भैसारे, खेमचंद हस्ते,ॲड.रश्मि डोंगरे,जैराम उंदिरवाडे, परसराम बांबोळे,सरपंच मनोहर पोटावी,लवकुश भैसारे,प्रेमदास रामटेके,रमेश डोंगरे,विभा खेवले, ‘कविता वालदे,देवाजी भैसारे,हिरकन्या साखरे,लोपा विजय शेंडे,प्रमोद सोरते,चरणदास खोब्रागडे,लालाजी नगराळे,विजया धाकडे,हेमलता गोवर्धन,प्रेमलता कानेकर,रोजा घागरगुंडे सुषमा भडके,लता रामटेके, प्रेमिला नानोरीकर,खेमदेव हस्ते,घनश्याम रायपूरे, चोखोबा ढवळे,नाजुक भैसारे, सतिश टेंभुर्णे,ज्योती मेश्राम,स्वाती वंजारी सहित बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.प्रसंगी बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या स्वाधिन करण्याचे निवेदन गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सिंगनजुडे यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांना शिष्टमंडळाने दिले.
- Advertisement -