Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीच्या सहाय्यक अभियंत्याला 'हनीट्रॅप' मध्ये अडकवीण्याचा प्रयत्न फसला…-चार जणांना १० लाखांची खंडणी...

गडचिरोलीच्या सहाय्यक अभियंत्याला ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकवीण्याचा प्रयत्न फसला…-चार जणांना १० लाखांची खंडणी मागणे पडले महागात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोलीतील एका विभागात कार्यरत सहाय्यक अभियंत्याला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपुरातून चार जणांना ताब्यात घेतले आहे.रविकांत कांबळे,सुशील गवई,रोहित अहीर अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश असून,एक महिला फरार आहे.सुशील गवई हा नागपुरात गुन्हे शाखेत पोलिस शिपाई,तर रविकांत कांबळे हा एका पोर्टलचा पत्रकार आहे. 

पत्रकार रविकांत कांबळे हा कॉर्लगर्लच्या माध्यमातून हनिट्रॅपमध्ये अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची तक्रार काल,रविवारी दि.२८ जानेवारी रोजी संबंधित अभियंत्याने पोलिसांत केली होती.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक नागपूरला रवाना झाले.चौकशीअंती त्यांनी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले.आज दुपारी चारही जणांना गडचिरोलीत आणण्यात आले.त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

४ डिसेंबर रोजी संबंधित सहाय्यक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता.शिपाई सुशील गवई हा अभियंत्याचा मित्र असल्याने तोदेखील तेथे हजर होता.ही बाब तिने तिची ओळख असलेल्या नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यास सांगितली.त्यामुळे त्याने ‘कॉलगर्ल’ आणि सुशील गवई यांना हाताशी धरून अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत १० लाखांची मागणी केली.महिनाभरापासून अभियंत्याकडे पैशासाठी तगादा सुरु होता. यामुळे त्रस्त झालेल्या अभियंत्याने काल,रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यावरून गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सोमवारी नागपूर येथे सापळा रचून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. दुपारी चारही जणांना गडचिरोलीत आणण्यात आले. पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!