उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पोलीस भरती,आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मुला-मुलीं करीता पहिल्यांदाच आज १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे ‘धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी’ ची स्थापना केली जात आहे.
‘धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी’ च्या माध्यमातुन जिल्ह्यातील गोरगरीब,होतकरू मुले-मुली पोलीस भरती,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेस पासून वंचित राहू नये; याकरिता तरुण पिढी करीता पहिल्यांदाच असा संपूर्ण उपक्रम मोफत राबविला जात असल्याने जिल्ह्यातील मुला-मुलींनी मोफत पोलीस भरती,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेसचा लाभ घ्यावा; असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी केले आहे.
देण्यात येणारे प्रशिक्षण व क्लासेस👇
मराठी व्याकरण,गणित,बुद्धिमत्ता चाचणी,सामान्य ज्ञान,जिल्ह्याची माहिती,गोंडी भाषा
शारीरिक चाचणीसाठी उपलब्ध मैदान👇
1600 मीटरचे मैदान
100 मीटरचे मैदान
गोळा फेक
देण्यात येणाऱ्या सेवा 👇
अनुभवी शिक्षक वर्ग,सेवानेतृत्व सेना अधिकारी,खेळाडू प्रशिक्षक यांच्याकडून प्रशिक्षण
सिसी टिव्ही कॅमेरा,प्रोजेक्टर वर शिकवणी व प्रशिक्षणाची सर्व आधुनिक साहित्य
धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी,गडचिरोली येथे जिल्ह्यातील मुला-मुलींकरीता संपुर्ण मोफत पोलीस,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेससाठी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक – 8605986779( तनुश्रीताई आत्रम)